breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आकुर्डी तहसील कार्यालयातील सातबारा फेरफार मशीन दुरूस्त करा

  • माजी उपमहापौर शैलजा मोरे यांची मागणी
  • तहसीलदार गीता गायकवाड यांना दिले निवेदन

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डीतील अप्पर तहसील कार्यालयातील सातबारा फेरफार मशीन मागील दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना फेरफार काढण्यासाठी खडकमाळ येथील तहसील कार्यालयात जावे लागते. यामध्ये नागरिकांचा बहुमुल्य वेळ वाया जात आहे. त्यामुळे आकुर्डीतील तहसील कार्यालयातील फेरफार मशीन तात्काळ कार्यान्वीत करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी तहसीलदार गीता गायकवाड यांच्याकडे केली आहे.

याबाबत आकुर्डी तहसील कार्यालयातील अपर तहसीलदार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये माजी उपमहापौर मोरे यांनी म्हटले आहे की, आकुर्डी तहसील कार्यालयातील फेरफार मशीन तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना फेरफार काढण्यासाठी खडकमाळ येथील तहसील कार्यालयात जावे लागत आहे. येण्याजाण्यामध्ये नागरिकांना विनाकारण आपला मौल्यवान वेळ वाया घालावा लागत आहे.

या कार्यालयात एका व्यक्तीला दोन टोकन देण्यात येते. त्याकरिता तासन-तास रांगेमध्ये उभे रहावे लागते. तरीदेखील वेळेमध्ये सातबारा फेरफार भेटत नाही. त्याचा फायदा तेथील एजंट लोक घेत आहेत. त्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आकुर्डीतील अप्पर तहसीलदार कार्यालयातील फेरफार मशीन तत्काळ चालू करावी, अशी मागणी माजी उपमहापौर मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. माहितीस्तव निवेदनाची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांना पाठविण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button