breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवाजी महाराज व विवेकानंदांचा आदर्श ठेवून तरुणांनी राष्ट्रकार्यात योगदान द्यावे – अनुप मोरे

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी महापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे यांच्या वतीने त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी (दि. १२) राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

शैलजा मोरे म्हणाल्या की, ‘राजमाता जिजाऊ ह्या आदर्श गुरू आणि माता आहेत. त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची संकल्पना सांगितली. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली. त्यांचे अनुकरण आजच्या महिलांनी करावे.

अनुप मोरे म्हणाले, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती या सर्वांचे औचित्य साधून तरूणांनी आपले बहुमुल्य आयुष्य निर्व्यसनी ठेवण्याचा संकल्प करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा व स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तरुणांनी राष्ट्रकार्यात स्वतःला झोकून द्यावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button