breaking-newsपिंपरी / चिंचवड

आकुर्डीमध्ये ८ श्वान मृतावस्थेत आढळले; नगरसेवक जावेद शेख यांच्याकडून शवविच्छेदनाची मागणी

आकुर्डी । रस्त्यावरील सुमारे आठ भटकी कुत्री अचानक मृत आवस्थेत आढळल्याने आकुर्डी निगडी परिसरांत घबराटीचे वातवारण पसरले असून खळबळही उडाली आहे.
काल अचानक परिसरांतील आठ कुत्री मृत आवस्थेत आढळून आली आहेत. या कुत्र्यांचा मृत्यू कोरोनाने झाला असण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व स्थानिक नेते जावेद शेख यांनी व्यक्त केली असून या मृत कुत्र्यांचे शवविच्छेदन केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात महापालिका प्रशासनाने ही कुत्री भुकेमुळे मेली असावीत असा अंदाज व्यक्त केला असून कोणीतरी अन्नातून विष कालवल्यामुळे देखिल त्यांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र कारण कोणतेही असो या कुत्र्यांचे शवविच्छेदन केले जावे अशी मागणी होत आहे. परंतू पिंपरी चिंचवड शहरात प्राण्यांचे शवविच्छेदनाची कोणतीच सुविधा नसल्याने हे शवविच्छेदन होवू शकत नसल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button