breaking-newsराष्ट्रिय

“आई मला माफ कर, कुठल्याही मुलीसोबत माझे प्रेमसंबंध नाहीत” मुलाची चिठ्ठी लिहून आत्महत्या

“आई मला माफ कर, मी चाललोय कुठल्याही मुलीसोबत माझे प्रेमसंबंध नाहीत” असा भावनिक संदेश लिहून एका १९ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तर प्रदेशातील लखनऊमधील जानकीपूरम येथे ही दुर्देवी घटना घडली. भानू प्रताप सिंह (१९) असे मृत मुलाचे नाव असून सीतापूर रोडावरील एका खासगी कॉलेजमध्ये तो डिप्लोमाचे शिक्षण घेत होता.

भानू शुक्रवारी कॉलेजला गेला नाही. दुपारपर्यंत तो आपल्या खोलीतून बाहेर आला नाही. म्हणून बहिण त्याला बोलवायला गेली. तिने हाका मारल्या, दरवाजा ठोठावला पण आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडला तेव्हा भानू पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये होता. हे आत्महत्येचे प्रकरण असून शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

आम्हाला त्याच्या रुममध्ये आत्महत्येची चिठ्ठी मिळाली असून त्यात भानूने त्याच्या आईची माफी मागितली आहे तसेच कुठल्याही मुलीसोबत आपले प्रेमसंबंध नसल्याचे म्हटले आहे अशी माहिती जानकीपूरमचे एसएचओ मोहम्मद अश्रफ यांनी दिली. आम्ही कुटुंबियांकडे याबद्दल चौकशी केली. मुलीसोबत प्रेमसंबंध नसल्याचा विशेष उल्लेख त्याने का केला? याबाबत कोणी काहीच सांगितले नाही असे पोलीस म्हणाले. भानू गेल्या काही दिवसांपासून निराश होता पण याबद्दल तो कोणाशीच काही बोलला नाही असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button