breaking-newsपश्चिम महाराष्ट्र

आर.आर. पाटलांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, भाऊ आणि मुलाला लागण

सांगली – राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांच्या घरात दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. आर. आर. यांचा मुलगा रोहित पाटील आणि भाऊ सुरेश पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आमदार सुमनताई पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या स्थितीत लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मात्र सातत्याने लोकांमध्ये वावरावे लागत आहे. त्यातून अनेक लोकांशी संपर्क येत असल्याने बरीच काळजी घ्यावी लागत आहे. रोहित पाटील व सुरेश पाटील यांना याच जनसंपर्कातून करोनाची लागण झाल्याचे दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button