breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

डॉ. अमोल कोल्हेंचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; राष्ट्रवादीत आज करणार प्रवेश

  • राष्ट्रवादीच्या तिकिटावरुन शिरुर लोकसभेतून लढविणार

मुंबई – अभिनेते व शिवसेना नेते डॉ. अमोल कोल्हे आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज दुपारी तीन वाजता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हे व आणखी दोन माजी आमदार राष्ट्रवादी प्रवेश करतील.

टीव्हीवरील छत्रपती शिवाजी व संभाजी राजे यांच्यावरील वेगवेगळ्या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी मागील आठवड्याच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतली होती. या भेटीदरम्यान पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छूक असलेले प्रविण गायकवाडही उपस्थित होते. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर चार दिवसात अमोल कोल्हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधण्यास तयार झाले आहेत.

शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या भूमिका केल्यामुळे अमोल कोल्हे लोकप्रिय आहेत. खास करून मराठा समाजात त्यांना मानाचे स्थान आहे. सोबतच कोल्हे आपल्या प्रभावशाली वक्तृत्वशैलीमुळे प्रसिद्ध आहेत. कोल्हे यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने शिवसेनेने एक स्टार प्रचारक गमावला आहे.

अमोल कोल्हे यांनी बरोबर पाच वर्षापूर्वी मार्च 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याआधी त्यांची ऊठबस राज ठाकरेंसोबत होती. मात्र, सक्रिय राजकारणात त्यावेळी ते नव्हते. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढली होती. त्यावेळी कोल्हे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. त्यानंतर 2015 मध्ये उद्धव ठाकरे यांनी कोल्हे यांच्याकडे पुणे व पिंपरी-चिंचवड विभागाचे सहसंपर्कपद दिले होते. मात्र, 2017 मध्ये झालेल्या पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांत शिवसेनेला दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आपण पराभवाची नैतिक जबाबदारी घेत असल्याचे पत्र कोल्हे यांनी उद्धव ठाकरेंना लिहले होते. नंतरच्या काळात सक्रिय राजकारणातून थोडे बाजूला होते छत्रपती संभाजी महाराज मालिकेवर लक्ष केंद्रित केले होते.

आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे राजकारणात सक्रिय होत असल्याचे दिसत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार असून, शिवसेनेचे सलग तीन वेळा खासदार झालेले शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी दोन हात करतील. अर्थात भाजप-शिवसेना यांची युती झाली असल्यामुळे नवखे कोल्हे काही चमत्कार करू शकतील हे म्हणणे आतातरी धाडसाचे ठरेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button