breaking-newsराष्ट्रिय

आईची हत्या करुन मित्रासोबत गेली फिरायला, अंदमानधून आरोपी मुलीला अटक

बंगळुरुत एका तरुणीने आपल्या आईची हत्या करुन भावावर चाकूने वार करत जखमी केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी मुलीला तिच्या मित्रासोबत अंदमान येथून अटक केली आहे. तरुणीने आधी आईची हत्या केली आणि नंतर भावावर चाकूने वार केले. भावाचाही मृत्यू झाला आहे असं तिला वाटलं होतं. यानंतर तिने घरातून पळ काढलेला होता. जखमी झालेल्या तिच्या भावाने पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला. यानंतर पोलिसांनी तरुणीला तिच्या मित्रासोबत अटक केलेली.

तरुणीच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बहिणीने आपल्या अंगावर खूप कर्ज असून तुम्हाला ते फेडावं लागू नये किंवा त्याचा त्रास होऊ नये म्हणून हत्या केल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. पण पोलिसांनी या हत्येमागे वेगळा हेतू असल्याचा संशय आहे. तरुणी पोर्ट ब्लेअर येथील एका हॉटेलमध्ये मित्रासोबत सापडल्याने पोलिसांना प्रेम प्रकरण असल्याचा संशय आहे. सध्या दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button