breaking-newsआंतरराष्टीय

इंग्लंडमधल्या पहिल्या भारतीय हॉटेलच्या मेनूकार्डचा लिलाव

लंडन : पटणा येथे वास्तव्य करणाऱ्या सेक देन मोहम्मद यांनी २०० वर्षांपूर्वी लंडन येथील जॉर्ज स्ट्रीटवर एक भारतीय कॉफी हाऊस सुरु केले होते. हिंदुस्थानी कॉफी हाऊस असे या कॉफी हाऊसचे नाव होते. लंडनमध्ये सुरु झालेले हे पहिले भारतीय हॉटेल होते. याच कॉफी हाऊसच्या हस्तलिखित मेन्यू कार्डचा लिलाव ८५०० पाऊंड्सना म्हणजेच भारतीय चलनानुसार ७ लाख ५८ हजार ४३० रुपयांना झाला. विशेष बाब म्हणजे हे मेनू कार्ड हस्तलिखित आहे. पायनापल पुलाव आणि इतर २५ पदार्थ या मेनू कार्डमध्ये हाताने लिहिण्यात आले आहेत.

या मेनूकार्डमध्ये चिकन लॉबस्टर, करी, चटणी, ब्रेड अशा अनेक डिशेशचा समावेश आहे. हे हॉटेल सुरु करणाऱ्या मोहम्मद यांचा जन्म १७५९ मध्ये बिहारमध्ये झाला. १७८२ पर्यंत मोहम्मद इस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यदलासाठी जेवण तयार करत असे. १७८२ मध्ये मोहम्मद पहिल्यांदा लंडनला गेले. तिथे त्यांनी शाम्पू विकण्यास सुरुवात केली मोहम्मदने ट्रॅव्हल्स ऑफ डीन मोहम्मद या नावाने एक पुस्तकही लिहिले. हे पुस्तक भारतीय लेखकाने लिहिलेले पहिले इंग्रजी पुस्तक आहे असे मानले जाते. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातले वृत्त दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button