breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अपुऱ्या माहितीच्या आधारे भाजप नेत्यांकडून पिंपरी चिंचवडची होतेय बदनामी?

चित्रा वाघ यांच्यामुळेच “भाजपा’चे पितळ उघडे पडले

पिंपरी |महाईन्यूज|

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून आठ महिन्यांत पिंपरी चिंचवडला 44 खून आणि 87 बलात्कार झाल्याचे ट्‌विट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी 5 ऑक्‍टोबर रोजी केल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, गेल्यावर्षी भाजपची सत्तेत आठ महिन्यांच्या कालावधीत तब्बल 47 खून आणि 121 बलात्काराचे गुन्हे घडल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडची बदनामी करणाऱ्या चित्रा वाघ यांच्यामुळे “भाजपा’चे पितळ उघडे पडले आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या अत्याचार आणि खून प्रकरणामुळे भाजपची संपूर्ण देशात नाचक्‍की झाली आहे. महाराष्ट्रातील भाजप वगळता इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवत योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याला उत्तर देण्यासाठी आता भाजपही मैदानात उतरला आहे. नुकत्याच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारला चपराक देण्यासाठी आणि टीका करणाऱ्यांची तोंडे बंद करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीची आकडेवारी देत राज्य सरकारवर टीका केली.

1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2020 या आठ महिन्यांच्या कालावधीत पिंपरी चिंचवड शहरात 44 खून आणि 87 बलात्काराच्या घटनांची नोंद झाल्याचे ट्विट केले आहे. महाराष्ट्रात कायद्याची भिती, धाक उरलेला नाही. जरा इतरांची धुणी धुवून झाली असतील तर आता आपल्या घरात लक्ष द्या, असेही या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. तसेच सीएमओ महाराष्ट्र आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही हे ट्‌विट टॅग केले आहे.

मात्र वस्तुस्थिती समोर आल्यानंतर चित्रा वाघ व भाजपाचेच पितळ उघडे पडले आहे. गेल्यावर्षी राज्यात भाजपची सत्ता होती. गेल्या वर्षी 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2019 या आठ महिन्यांच्या कालावधीत पिंपरी चिंचवड शहरात खूनाच्या 47 तर बलात्काराच्या 121 घटना घडल्या होत्या. यंदाच्या वर्षी खूनाची आकडेवारी चारने तर बलात्काराची आकडेवारी 34 ने घटली आहे. असे असतानाही चित्रा वाघ यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे पिंपरी चिंचवड शहराची बदनामी केल्यामुळे त्यांच्याविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button