breaking-newsराष्ट्रिय

बापरे! भर वर्गात शिक्षकाने महिला सहकाऱ्याचे घेतले चुंबन

विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. शाळेकडून मुलांना शिक्षणाबरोबर चांगल्या संस्कारांची शिदोरी मिळते. मुलांसमोर शिक्षकांचे वर्तन नेहमीच आदर्शवत असले पाहिजे. पण काही शिक्षकांना त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीचा विसर पडतो. परिणामी समाजासमोर चांगले उदहारण ठेवण्याऐवजी ते शिक्षण क्षेत्राचे नाव खराब करतात. राजस्थानच्या कारौली गावातील एका शिक्षकाचे भर वर्गातील विद्यार्थ्यांसमोरचे वर्तन सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला आहे.

करौली गावातील शिक्षकाच्या अयोग्य वर्तनासंबंधी जेव्हा राजस्थान सरकारमधील मंत्र्याला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने उत्तर देण्याचे टाळले. भर वर्गात शिकवणीचा तास तालू असताना एका शिक्षकाने दुसऱ्या महिला शिक्षिकेचे चुंबन घेतले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मंचावर एकूण तीन शिक्षक दिसतात. महिला शिक्षक विद्यार्थ्यांसमोर बोलत असताना शेजारी बसलेल्या पुरुष शिक्षकाने महिला शिक्षिकेच्या गालाचे चुंबन घेतले. भरवर्गात विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शाळा प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे. कारौली गावातील उच्च माध्यमिक शाळेमध्ये हा प्रकार घडला. शिक्षकाने सहशिक्षिकेच्या गालाचे चुंबन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी वर्गाच एकच आरडाओरडा सुरु केला. नियमांचे उल्लंघन करुन शाळेचे नाव खराब करणाऱ्या या शिक्षकाविरोधात अजून कारवाई झालेली नाही. राजस्थानचे उच्च शिक्षण मंत्री भंवर सिंह भाटी यांना जेव्हा, याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. राज्यात जेएनयू सारखे विद्यापीठ स्थापन करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. नोव्हेंबर २०१८ मध्ये गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात शाळेमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button