breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“महाईन्यूज”ची दखल: विषयपत्रिकेतील चुकीबाबत स्थापत्य विभागाचा खुलासा

पिंपरी – शहरात महिला व पुरूषांसाठी कासारवाडीमध्ये स्वच्छता गृहे बांधण्याचे दोन वेगवेगळे प्रस्ताव स्थापत्य विभागाने स्थायीच्या मंजुरीसाठी मंगळवारी (दि. 11) सभेपुढे आणले होते. मात्र, विषयपत्रिकेतील या दोन्ही विषयांमध्ये दर्षविलेले स्वच्छतागृह आणि मुता-यांची संख्या एक सारखीच दाखविण्यात आली. मात्र, त्यासाठीच्या खर्चात तफावत होती. याबाबतचे वृत्त “महाईन्यूज”ने प्रसिध्द केल्यानंतर स्थापत्य विभागाला जाग आली आहे. स्वच्छता गृह आणि मुता-यांची संख्या दर्षविताना विषयपत्रिकेत कॉपी पेस्ट होऊन चूक झाल्याचा खुलासा या विभागाने केला आहे. त्यामुळे संख्या कमी जास्त असल्याने खर्च देखील कमी जास्त प्रमाणात दर्षविला असल्याचे स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरीष पोरेडी यांनी सांगितले आहे.

 

कासारवाडी येथील विद्याविकास शाळेजवळ “पे अण्ड युज” तत्वावर सुलभ शौचालय बांधण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला. त्यानुसार पुरुषांकरिता दहा स्वच्छता गृह, सहा मुता-या आणि स्त्रियांसाठी सात स्वच्छता गृहे बांधण्याचा उल्लेख त्यामध्ये केला. एका विषयातील बांधकामाचा खर्च 93 लाख रुपये 94 हजार 671 एवढा दर्शविला. दुस-या विषयात देखील पुरुषांकरिता दहा स्वच्छता गृह, सहा मुता-या आणि स्त्रियांकरिता सात स्वच्छता गृहे बांधण्याचा उल्लेख केला गेला. मात्र, या विषयातील खर्चाची रक्कम 59 लाख 63 हजार 354 एवढी दर्शविण्यात आली. याबाबतचे वृत्त “महाईन्यूज”ने प्रसिध्द केल्यानंतर पालिकेच्या स्थापत्य विभागाने याबाबतचा खुलासा केला आहे.

 

दोन्ही विषय वेगवेगळे असून दोन्ही विषयांमध्ये बांधण्यात येणारी स्वच्छता गृहे आणि मुता-यांची संख्या कमी जास्त प्रमाणात आहे. परंतु, स्थायीच्या विषयपत्रिकेत कॉपी पेस्ट झाल्यामुळे ती संख्या एकच राहिली असून खर्चाची रक्कम ही कमी जास्त दाखविली आहे. ही प्रशासकीय चूक असून त्यामध्ये दुरूस्त करण्यात आली आहे. तथापी, याबाबतचा खुलासा करण्यात येत असल्याचे स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरीष पोरेडी यांनी “महाईन्यूज”शी संवाद साधताना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button