breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ३७३.३५ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक आराखड्यास मान्यता

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ करिता एकुण ३७३.३५ कोटी रुपयांच्या आराखड्यास आज राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. डिपीसीमधून उपनगर जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

वांद्रे येथील चेतना महाविद्यालयाच्या सभागृहात आज ही बैठक झाली. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, महापालिका आयुक्त प्रविण परदेशी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगरसेवक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सर्वसाधारण योजनेसाठी ३१९.३६ कोटी, अनुसुचित जाती उपयोजनेसाठी ५१.१४ कोटी तर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी २.८५ कोटी अशा एकुण ३७३.३५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button