breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Good News: आता महाराष्ट्रात घेऊ शकता स्वस्तात घरं, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई: महाराष्ट्रात आपल्या हक्काचं घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली 31 डिसेंबरपर्यंत घर खरेदीवरील स्टम्प ड्युटीत मोठी कपात केलेली आहे. त्यामुळे यासाठी आता राज्यात स्वस्तात घरं घेणं सहज सोपं आहे. कोरोनाच्या संकटामुळे राज्यात रिअल इस्टेट क्षेत्रात प्रगती सुस्तावली असल्याचं चित्र आहे. पण याच क्षेत्राला आता पुन्हा उभं करण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेतलेला आहे.

5 टक्क्यांवर असलेली स्टम्प ड्युटी ही 2 टक्क्यांवर आणण्यात आलेली आहे. खरंतर कोरोनाच्या महामारीमुळे राज्यावर आर्थिक संकट कोसळलेलं आहे. अशात स्टॅम्प ड्युटी कमी केल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर आणखी ताण येऊ शकतोय. पण रिअल इस्टेट क्षेत्राला पुढे आणण्यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. अशात कोरोनाच्या संकटात अनेकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे घरं घेणाऱ्यांसाठी देखील फायद्याची बाब आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button