breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

#HijabRow: उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; तरुणांबद्दल व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा; म्हणाले…

मुंबई |

कर्नाटकातला महाविद्यालयातील हिजाब बंदीचा वाद आता चांगलाच चिघळला आहे. या वादाचे पडसाद देशभरात उमटू लागले आहेत. देशात अनेक ठिकाणी या प्रकाराच्या निषेधार्थ आंदोलनंही केली जात आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या हिजाबच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. हिजाबच्या वादावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, समाजात आणखी फूट पडेल अशा घटना टाळायला हव्यात. याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, हे दुर्दैवी आहे. भारतीय संस्कृती आणि संविधान आपल्याला जातीय आणि धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडायला शिकवत नाही. विशेष म्हणजे कर्नाटकात सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादावरून राजकारण तापले आहे.

दुर्दैवाने काही लोक अशा विषयांमधून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आज जग पुढे जात आहे. प्रगत देश आणखी प्रगत होत आहेत. आपल्या देशात तरुणांची एवढी मोठी फळी असताना तरुणाईचा वापर विकासासाठी कसा करता येईल याचा विचार करायला हवा, असे अजित पवार म्हणाले.अशावेळी एखादी व्हिडीओ क्लिप व्हायरल केली जाते, मग त्यावरुन कुणीतरी ट्विट करतं, त्यावर काऊंटर ट्विट पडतात आणि मग त्यातून निष्कारण विषयाला महत्त्व दिले जाते. याबाबत सर्वांनी समंजस भूमिका घेऊन संयम ठेवला पाहिजे, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

महाराष्ट्रापासून पश्चिम बंगाल पर्यंत हिजाब घालू देण्याच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मालेगावसह पुण्यात हिजाबच्या समर्थनात आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दुसऱ्या राज्यातील घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन न करणे योग्य नसल्याचे म्हटले होते. “आपण शाळेत, कॉलेजमध्ये जातो तेव्हा शिक्षणालाच प्राधान्य दिले पाहिजे. शैक्षणिक संस्थाचे जे नियम असतील ते सर्वांनी पाळले पाहिजेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की दुसऱ्या राज्यामध्ये घडणऱ्या एखाद्या घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन करुन समाजात अशांतता निर्माण करणे राज्याच्या हिताचे नाही. राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करणे योग्य नाही. मी सर्वांना आवाहन करतो की शांतता ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा,” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button