breaking-newsराष्ट्रिय

जम्मू कश्मीरमधील कुलगाममध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, तीन जवान जखमी

जम्मू कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुलगाममधील नागनाद चिमेर भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती जवानांना मिळाल्यानंतर या भागात कारवाई सुरू करण्यात आली. कश्मीर पोलीस, 09 राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी ही संयुक्तरित्या या भागात शोध मोहिम सुरू केली. यावेळी जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत ते अद्याप समोर आलेले नाही. 2020 मध्ये आतापर्यंत 131 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात हंदवाडातील नौगाम सेक्टर येथील नियंत्रण रेषेहून घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या घटनेला 5 ऑगस्टला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याआधी जम्मू कश्मीरमध्ये घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे. त्यासाठी घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबतची माहिती गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलाला देत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button