breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आंतरराष्ट्रीय योग दिन, पिंपळे साैदागरमध्ये योग शिबीर संपन्न

पिंपरी ( महा ई न्यूज ) – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नगरसेविका निर्मला संजय कुटे सोशल फाउंडेशन, महिला पंतजली योग समिती, नवचैतन्य हास्य क्लब व ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने कोकणे चाैकातील लिनीयर गार्डनमध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिला, मुली, ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता.

यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, भारतीय वारकरी सांप्रादायाचे कोषाध्यक्ष शेखर कुटे, नवचैतन्य हास्यक्लब अध्यक्षा इंदुताई सुर्यवंशी, मल्हारी कुटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शिबिरास प्रारंभ झाला.

या शिबिरास भानुदास काटे, आशा डोंगरे, अरुण चाबुकस्वार, शामकांत क़ोंबे,  राजाराम कांबळे, रमेश खंडारे, मनिषा शिर्के, दिपक मारावार, संजय कुटे, चंद्रकांत कुटे, दत्तात्रय कुटे, संतोष नवले, बाळासाहेब कुटे, प्रियतोश मैत्रा, नवचैतन्य हास्य क्लब, कोकणे चौक जेष्ठ नागरीक संघटनेचे सभासद, रहाटणी-पिंपळे सौदागर मधील नागरीक योग शिबिरात सहभागी झाले होते.

यावेळी अविनाश सुर्यवंशी म्हणाले की, भारतीय संस्कृती, हिंदु धर्मात योगासनाचे महत्व यावर नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांकडून योगाची आसने करुन घेतली.  तसेच नगरसेविका निर्मला कुटे म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण जगभरात योगाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर २१ जुन योग दिवस साजरा होवू लागला. संपुर्ण जगात योगाचा प्रसार व प्रचार सुरु आहे. योगामुळे आपले आरोग्य चांगले राहते. यापुढे योगाची शिबिरे घेण्यात येतील, असे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button