breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

‘बिपरजॉय’चं राजस्थानमध्ये थैमान, राजस्थानमध्ये ‘अशी’ आहे परिस्थिती..

Biporjoy : राजस्थानमध्ये बिपरजॉय वादळामुळे सध्या मुसळधार पाऊस होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी ३०० मिमी म्हणजेच १२ इंच पावसाची नोंददेखील झाली आहे. ताज्या माहीतीनुसार, पाली, जालोर, बारमेर आणि सिरोहीमध्ये सध्या पूरस्थिती आहे. तसेच राजस्थानमध्ये पूर आणि पावसामुळे आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय.

जयपूर हवामान केंद्राच्या मते, १९ आणि २० जून रोजी भरतपूर, कोटा विभागात ‘बिपरजॉय’ सक्रिय असणार आहे. तर, चक्रीवादळाची तीव्रता आणखी कमी होईल. डिप्रेशनमुळे कमी दाबाचा भाग तयार होईल. तसेच चक्रीवादळ सध्या ताशी १० किमी वेगाने ईशान्य दिशेकडे सरकत आहे. राजस्थानमधील अनेक गावे-शाळा-हॉस्पिटलमध्ये पाणी घुसले आहे.

हेही वाचा – आता बांधकामासाठी ‘या’ परवानगीची गरज नाही?

नवी दिल्लीच्या हवामान केंद्राच्या अहवालानुसार, २०११ ते २०२३ पर्यंत अरबी समुद्रामध्ये २० हून अधिक चक्रीवादळे आली. त्यातील सर्वात प्रभावी आणि प्रदीर्घ सक्रिय चक्रीवादळ म्हणजे बिपरजॉय! अरबी समुद्रातून आतापर्यंत आलेल्या वादळांपैकी बिपरजॉय हे वादळ सर्वात प्रभावी मानले जात आहे, कारण ते सलग १३ दिवस सक्रिय राहिले आहे.

अरबी समुद्रात ६ जून रोजी चक्रीवादळ डिप्रेशनच्या रूपात सुरू झाले, त्यानंतर डीप डिप्रेशन, चक्रीवादळ आणि तीव्र चक्रीवादळ, मग अत्यंत तीव्र चक्रीवादळ असे बदलत गेले. याआधी ऑक्टोबर २०१८ मधील ‘लुबान’ चक्रीवादळ १० दिवस सक्रिय होते तर ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मधील चक्रीवादळ ‘क्यार’ १० दिवस सक्रिय होते, अशी माहीती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button