breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये आढळला कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण

अहमदनगर | महाईन्यूज |

अहमदनगरमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. या रुग्णावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अहमदनगरचे जिल्हाधिकारी  राहुल द्विवेदी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे अहमदनगरमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

अहमदनगरमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील ४ जण दुबईला फिरण्यासाठी गेले होते. त्याठिकाणावरुन परत आल्यानंतर यामधील सर्वांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. तर यामधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहमदनगरच्या या चारही जणांनी त्याच विमानातून प्रवास केला होता ज्या विमानातून पुण्यातील पाच कोरोनाबाधित रूग्णांनी प्रवास केला होता. 

गेल्या १३ दिवसांपासून चौघांची रोज डॉक्टर तपासणी  करत होते. पण सर्दी, खोकला आणि ताप यांसारखे कोणतेही लक्षणे आढळून आले नसल्याने त्यांना घरी सोडले होते. मात्र त्याच्या रक्ताचा तपासणी अहवाल आल्यानंतर एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या रुग्णाला तातडीने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात एका स्वतंत्र कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आणि चांगली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button