breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दोन एटीएम फोडले

पिंपरी | महाईन्यूज

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील रहाटणी आणि म्हाळुंगे येथील दोन एटीएम फोडण्याची घटना बुधवारी सकाळी उडघकीस आली आहे. रहाटणीतून सुमारे तेरा लाख आणि म्हाळुंगेतील एटीएमचोरीचा प्रयत्न फसलेला आहे.रहाटणी येथे लिंक रोडवर आरबीएल बँकेचे एटीएम मशिन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून आतील तब्बल तेरा लाखाची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे.

अजय लक्ष्मण कुरणे (वय ३७, रा. आळंदी रोड, कळस) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने यांनी याबाबत माहिती दिली आहे. रहाटणी येथे लिंक रस्त्यावर आरबीएल बँकेचे एटीएम वेंष्ठद्र आहे. बुधवारी पहाटे तीन चोरटे एटीएम वेंष्ठद्रात घुसले. गॅस कटरच्या सहाय्याने त्यांनी एटीएम मशिन फोडली. मशिनचा सुरक्षा दरवाजा कट केला. मशिनची तोडफोड करून आतील रोकड चोरून नेली. त्यामध्ये ५ लाख ८० हजार रुपये किमतीच्या दोन हजाराच्या २९० नोटा, ६ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीच्या ५०० रूपयांच्या १२१९ नोटा आणि ९४ हजार ६०० रुपये किमतीच्या १०० रूपयांच्या ९४६ नोटा अशी १२ लाख ८४ हजार १०० रूपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास चोरीचा प्रकार निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button