breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतात कोरोनाचा दुसरा बळी, दिल्लीमध्ये एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात दहशत पसरवली आहे. कोरोनामुळे जगभरात मृतांच्या आकड्यामध्ये सतत वाढ होत आहे. अशात भारतात सुद्धा मृतांचा आकडा वाढला आहे. भारतात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे. दिल्लीमध्ये एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याआधी कर्नाटकातील कलबुर्गी येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या मुलाला सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या महिलेचा मुलगा मागच्या महिन्यात स्वीझरलँड आणि इटलीचा प्रवास करुन आला होता. त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याच्या घरातील सर्वांची तपासणी करण्यात आली असता त्याच्या आईला सुध्दा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर दोघांना ७ मार्च रोजी राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘मृत महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. मात्र कोरोनामुळे ९ मार्च रोजी तिची प्रकृती आणखी खालावली. त्यानंतर तिला अतिदक्षता विभागात नेण्यात आले. अशातच उपचारा दरम्यान १३ मार्च रोजी रात्री उशिरा महिलाचा मृत्यू झाला.’ दरम्यान, भारतामध्ये ८२ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात तर यामध्ये १७ परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button