breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

अरविंद केजरीवाल-अमित शहांची भेट, दिल्लीच्या विकासासाठी करणार एकत्र काम

दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा यांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली. अरविंद केजरीवाल आणि अमित शहा यांची ही पहिलीच भेट आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल लागोपाठ तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही एक सदिच्छा भेट होती. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दिल्लीच्या विकासावर चर्चा झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली होती. यावेळी बऱ्याचदा ते आक्रमक झालेले सुध्दा दिसले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button