ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणे

कोणाची दिवाळी तर कोणाचे दिवाळे!

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीवर दोन्ही पक्षांनी केले दावे

पंधरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका व पाच गावात पोट निवडणुकांचे निकाल ः राष्ट्रवादी-भाजपचे वर्चवस्व

वडगांव मावळ: वडगाव मावळ मावळ तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका व पाच गावात पोट निवडणुकांचे निकाल सोमवारी वडगाव येथे जाहीर करण्यात आले. निकाल ऐकण्यासाठी सकाळ पासूनच मोठी गर्दी झाली होती.त्यामुळे परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. जस जसे निकाल जाहीर झाले तसा बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. या निवडणुकीत काही उमेदवाराची दिवाळी झाली तर काहींचे दिवाळे निघाले. वडगाव येथील भेगडे लाॅन्समध्ये सकाळी १० वाजता मतमोजनी सुरुवात झाली. यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख, अप्पर तहसीलदार अजित दिवटे, निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक, पोलिस निरीक्षक कुमार कदम आदी उपस्थित होते.

ऐंशी टक्के ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाचे वर्चस्व ः राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे
तालुक्यातील ऐंशी टक्के ग्रामपंचायती अजित पवार गटाने जिंकल्या आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामांसाठी दिलेला कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणि आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाचा हा विजय आहे. गावपातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या कष्टाचे हे फळ आहे.हा विजय गावाच्या विकासासाठो समर्पित करीत आहे.

१८ पैकी १० ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यातः रविंद्र भेगडे
मावळ विधानसभा निवडणुक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी सांगितले तालुक्यातील आढले, ओव्हळे, डोणे, साळुंब्रे, शिळीम, जांभवडे, आंबळे, उदेवाडी ,पुसाणे, लोहगड अशा दहा ग्रामपंचायती भाजपचा झेंडा फडकला आहे .कार्यकर्त्यांनी गावोगावी चांगली बांधणी केल्याने या निवडणुकीत भाजपचे बळ वाढले आहे, ते बळ आगामी निवडणुकीतही दिसेल.

मावळ तालुक्यात ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व

रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुका 

भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश 10 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा.

भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख मा.श्री. रविंद्र आप्पा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली व मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या मार्गद्शनाखाली झालेल्या मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने 18 ग्रामपंचायत पैकी 10 ग्रामपंचायतवर झेंडा फडकवला आहे. रविंद्र भेगडे यांची मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख पदी व दत्तात्रय गुंड यांची तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असून यामध्ये महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सर्वच ग्रामपंचायत वर जनतेने भारतीय जनता पार्टीच्या शिलेदारांना गाव कारभार करण्याची संधी दिली आहे..!

आगामी निवडणुकांची नांदी…
या सर्व ग्रामपंचायतचे निकाल पाहता मावळ तालुक्यातील सामान्य जनता आजही भारतीय जनता पार्टीच्याच पाठीमागे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मावळ लोकसभा व मावळ विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार विजयी होणार असून, आजचा निकाल हा त्याचीच नांदी असल्याचे रविंद्र भेगडे व दत्तात्रय गुंड यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले.

1. राज्यात अजित पवार गट व भाजप एकत्र मात्र मावळात ग्रामपंचायत निकालावरून दोन्ही पक्षात श्रेयाची लढाई राष्ट्रवादी म्हणते 80 टक्के तर भाजप म्हणते 10 ठिकाणी सरपंच आमचाच…

2. मावळ तालुक्यात सरपंच व सदस्यासाठी एकच उमेदवार विजयी होण्याचा मान मळवंडी ढोरे ग्रामपंचायतीला मिळाला. या ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची आली असून, सरपंच पदासाठी गोरखनाथ काशीनाथ ढोरे हे सरपंच आणि सदस्य पदासाठी विजयी झाले.

पोट निवडणुक
१) दारूंब्रे
निवडून आलेले सदस्य
मयूर संजय वाघोले २७६
रामदास शशिकांत वाघोले २७४
अर्चना गणेश वाघोले ३०७

२) खांडशी

जयश्री विजय शिरसट १९१

३) नवलाख उंब्रे
तृप्ती अनिल नरवडे बिनविरोध

४) शिवने
सुनिल विष्णू दाभाडे बिनविरोध
शुभांगी राजेंद्र खैरे बिनविरोध

५) कुसगावं बू.
रवींद्र दशरथ कालेकर ५५५

६) कान्हे

पूजा गोरख चोपडे २७७

७) पुसाणे बिनविरोध

अमोल ज्ञानेश्र्वर वाजे सरपंच

अनिल वागू वाजे सदस्य
सुजाता काळुराम वाजे सदस्य
तुषार परशुराम आवंढे सदस्य
उज्वला संतोष वाजे सदस्य
सीमा योगेश वाजे सदस्य
भरत धनाजी वाजे सदस्य
सारिका बाळू मेटे सदस्य

८) शिरगाव
पल्लवी प्रवीण गोपाळे सरपंच बिनविरोध

९) सावळा
मनीषा दशरथ आढारी बिनविरोध

१०) चीखलसे
शोभा संभाजी शिंदे ३३८ सदस्य

सार्वत्रिक निवडणुका
१) सुदवडी
सुमित शिवाजी कराळे ५३० सरपंच
आकाश चंद्रशेखर गोतरणे २१५ सदस्य
प्रतीक्षा रवींद्र वाळुंजकर २१० सदस्य
सायली सुधीर कराळे २०२ सदस्य
गुलाब दत्तात्रय कराळे १५३ सदस्य

वैशाली नितीन शिंदे १४९ सदस्य
वैभव चंद्रकांत गाडे १४६ सदस्य
प्रीती कैलास शिंदे १४२ सदस्य

२) जांबवडे
तानाजी बंडू नाटक २८१ सरपंच
पूजा प्रकाश भोसले १३४ सदस्य
पल्लवी मंगेश नाटक १३२
सागर केशव नाटक १००
नंदा गणेश भोसले ११८
दत्तात्रय मनोहर भोसले ५८
पूनम योगेश नाटक ७३
सचिन वसंत इंगळे बिनविरोध

३) बेबडओहोळ बिनविरोध
तेजल राकेश घारे सरपंच
अमोल राजाराम हिंगे सदस्य
पार्वती राजाराम सप्रे सदस्य
सुवर्णा गोरख हिंगे सदस्य
तेजस भीमराव आडगळे
महेश त्रिंबक घारे
रुचिता विकी ढमाले
राहुल वसंतराव घारे
सायली रवींद्र घारे
प्रकाश बबन घारे
प्रमिला अनिल भालेराव
ज्योती गोरख घारे

४) मुंढावरे
राणी सन्नी जाधव ६७८ सरपंच
सचिन दत्तू गरुड २०२ सदस्य
स्वप्नजा भावेश थोरात २१८ सदस्य
शोभा विलास वाघमारे २०७ सदस्य
संदीप बबन जाधव २०५
कविता सदाशिव बांगर २१८
सारिका सुनिल बागर २३६

५) कोंडिवडे अमा
राधा विश्वनाथ मुठारकर २३१ सरपंच
किरण किसन तळवडे १०० सदस्य
अरुण वसंत तळवडे बिनविरोध
उर्मिला कळूराम तळवडे बिनविरोध
राधिका संजय तळवडे बिनविरोध
अजित बाळू कडू बिनविरोध
पुष्पलता योगेश कडू बिनविरोध
माधुरी राजेंद्र तळवडे बिनविरोध

६) भाजे
प्रिया अमित ओव्हाळ ६९४ सरपंच
प्रमोद विजय ढगे २२१ सदस्य
विकास बबन वाल्हेकर १९०
सरिका विश्वनाथ पदमुले २०१
प्रमोद प्रकाश वाशिवले २५१
ज्योती राजेश कोकाटे २६८
उज्वला अभिजित काळे २४८
प्रताप कैलास गरवड २११
कविता अशोक चौरे २०५
कोमल किरण केदारी २४३

७) सांगीसे
सुनिता योगेश शिंदे ६३४ सरपंच
कैलास पंढरीनाथ गरवड २१७
रेश्मा चेतन ढमाले २४७
अनुसया तुकाराम शेडगे २२१
नितीन एकनाथ ढवळे १८१
अंजली उमेश थोरात २०७
सुष्मा गणेश टाकळकर बिनविरोध
तुकाराम राजाराम टाकळकर बिनविरोध

८) उदेवाडी
नेहा अक्षय उंब्रे १२० सरपंच
सरिता संतोष ढाकोळ १०० सदस्य
मनोज गणपत वरे ७४ सदस्य
दिपीका प्रताप उंब्रे बिनविरोध
प्रताप नथु उंब्रे बिनविरोध
चंदा रवी जाणीरे बिनविरोध
निलेश खंडू वरे बिनविरोध
पद्मा मनोज वरे बिनविरोध

९) दीवड
गणेश खंडू राजीवडे ८१८ सरपंच
रामदास सोमनाथ लोखरे २२५
पौर्णिमा किसन लोखरे २२६
मनोहर मारुती शेडगे ३८२
देविदास नाथा सावळे ३७९
अपेक्षा सचिन राजीवडे ३९२
रुपाली शैलेश भालेराव बिनविरोध
रोशन शिवाजी सावळे बिनविरोध
प्रतीक्षा विश्वास भालेराव बिनविरोध
जना संदीप सावळे

१०) कल्हाट
शिवाजी तानाजी करवंदे ७६१ सरपंच
सोमनाथ सबाजी अगिवले २९१ सदस्य
कल्पना किसन यादव २९२
सुनिता पांडुरंग धनवे २९१
देविदास रोहिदास धनवे १६५
रंजना संतोष पवार १८९
बिबिषन तारू पवळे १८५
मनीषा संतोष पवळे २२६

११) आंबळे

अशा संपत कदम ९७३ सरपंच
तानाजी तुकाराम पवार २४८ सदस्य
सागर यशवंत पवार २४७
रुपाली कैलास चव्हाण २४३
नवनाथ रघुनाथ मोढवे २५७
स्वाती जयेश शेटे ३००
सुनिता सतीश पिलाने २७५
भानुदास मारुती कदम ४९४
अशा विलास भांगरे ४१९

१२) लोहगड बिनविरोध

सोनाली सोमनाथ बैकर सरपंच
पंढरीनाथ दत्तू विखार सदस्य
ज्योती सागर धनिवले
स्वाती विकास मरगळे
स्नेहल बाळू ढाकोळ
महेश राजू शेळके
काजल नितीन ढाकोळ
अभिषेक अनंता बैकर

१३) डोणे

सरपंच ऋषिकेश कोंडीबा करके (537),
सदस्य विनोद वसंत वाघमारे (254),
निलम गणेश करके (225),
मृणाली मंगेश घारे (223),
योगेश बबन करके (175),
स्वाती हिरामण आरुठे (154),
समीर नामदेव खिलारी (153),
उज्वला सागर खिलारी (144),

१४) शिळिंब

सरपंच सिद्धांत चंद्रकांत कडू (777),
सदस्य विजय चंद्रकांत धनवे (336), अश्विनी मुकिंद ओव्हाळ (354), स्वाती मंगेश ढमाले (347), प्रविण हनुमंत चोरघे (330), अनिता विलास शिंदे (326), अर्चना नवनाथ गोणते (275), अरुणा रमेश भिवडे (273),

१५) साळुंब्रे

सरपंच विशाल शामराव राक्षे (785),
सदस्य सुभाष विनायक राक्षे (251),
सतीश अशोक राक्षे (233),
बिनविरोध सदस्य नंदा प्रदीप आगळे, स्नेहल कार्तिक विधाटे, रवींद्र रामचंद्र विधाटे, शीतल राहुल दवणे, तेजस्वी कमलेश राक्षे,

१६) आढले बुद्रुक बिनविरोध
सरपंच सुवर्णा बाळू घोटकुले,
सदस्य नितीन दत्तात्रय साळुंके,
पल्लवी संतोष वाघमारे,
जयश्री भरत घोटकुले,
संतोष खंडू कदम,
तानाजी नामदेव घोटकुले,
वंदना सुरेश घोटकुले,
मच्छिंद्र घट्टू म्हस्के,
प्रियांका ऋषिकेश घोटकुले,
अश्विनी विनोद वाघमारे,

१७) सुदुंबरे
सरपंच मंगल कालिदास गाडे (1256),
बिनविरोध सदस्य गोविंद बबन मेंढाळे, सुषमा निलेश गाडे, जयवंत तुकाराम बोरकर, सुनंदा गोरख गाडे, सुभद्रा ज्ञानोबा गाडे, ताराचंद मोहन गाडे, राहुल कुंडलिक गाडे, बाळकृष्ण खंडू गाडे, सविता पोपट गाडे, अलका उत्तम गाडे,

१८) मळवंडी ढोरे
सरपंच गोरख काशिनाथ ढोरे (417),
प्रकाश लक्ष्मण ढोरे (219),
निलम विशाल गायकवाड (180),
प्रिया संतोष ढोरे (179),
संभाजी बाळू ढोरे (123),
रेणुका शरद जाधव (124),
गोरख काशिनाथ ढोरे (107),
अनिता अमित ढोरे (99),

१९) ओव्हळे

बिनविरोध सरपंच दिलीप ज्ञानेश्वर शिंदे,
सदस्य तुषार तुकाराम साठे,
भाग्यश्री अविनाश साठे,
सविता हिरामण भालेराव,
संतोष मुकींदा भालेराव,
रेणुका रामदास वाटाणे,
समीर मल्हारी कराळे,
पौर्णिमा भूषण कारेकर,

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button