breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेने WHO बरोबरचे संबंध तोडले, दिले अधिकृत पत्र

वॉशिंग्टन : अमेरिका डब्ल्यूएचओपासून विभक्त, ट्रम्प सरकारने अधिकृत पत्र पाठविले आहे. अमेरिका आता यापुढे जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने डब्ल्यूएचओला या संदर्भात आपला निर्णय अधिकृत पत्राद्वारे कळविला आहे. 

अमेरिकेने WHOशी संबंध तोडल्याने डब्ल्यूएचओ आणि इतर देशांसाठी हा जबरदस्त झटका मानला जात आहे.  ट्रम्प सरकारने कोरोना व्हायरस प्रकरणात चीनच्या अंतर्गत डब्ल्यूएचओ काम करत असल्याचा आरोप केला होता. तसेच अमेरिकन सरकारने एप्रिलपासून डब्ल्यूएचओला दिलेला निधी थांबवला होता. त्याचवेळी इशारा दिला होता.

अमेरिकन माध्यमांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प सरकारने डब्ल्यूएचओकडून आपले सदस्यत्व मागे घेण्याबाबत एक पत्र पाठवले आहे. ६ जुलै २०२१ नंतर अमेरिका डब्ल्यूएचओचा सदस्य असणार नाही. १९८४ मध्ये ठरविलेल्या नियमांनुसार, कोणतेही सदस्यत्व मागे घेतल्याच्या एक वर्षानंतर, डब्ल्यूएचओमधून तो देश बाहेर पडू शकतो. त्यामुळे अमेरिकेचे सदस्य आता एक वर्षानंतर संपुष्टात येणार आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेला डब्ल्यूएचओचे सर्व थकबाकी परतफेड करावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button