breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

कर्मचाऱ्यांना जुलै 2021 पर्यंत घरातून काम करण्याची परवानगी

गुगल पाठोपाठ फेसबुकने कोरोना व्हायरसमुळे वर्क फ्रॉम होमचा कालावधी पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत.

कोरोना व्हायरमुळे मार्च महिन्यापासून जगभरातील मोठा कर्मचारी वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून काम करत आहे. करोनावर औषध शोधन्याचे काम सुरू असेल तरी अजून बराच कालावधी जाणार असल्याचे दिसते. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी कामाचे नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. भविष्यात देखील मोठ्या कालावधीसाठी वर्क फ्रॉम होमद्वारेच काम करावे लागणार असल्याने काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत.

सोशल मीडियावर अव्वल स्थानी असलेल्या फेसबुकने ४८ हजार कर्मचाऱ्यांना जुलै २०२१ पर्यंत घरातून काम करण्यास सांगितले आहे. फेसबुकने सर्व कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यासाठी लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंची खरेदी करण्यास सांगितले. या वस्तूंच्या खरेदीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला १ हजार डॉलर म्हणजे जवळपास ७५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अशाच प्रकारचा निर्णय याआधी गुगलने देखील घेतला होता. गुगलने त्यांच्या कर्मचाऱ्यांना जुन २०२१ पर्यंत घरातून काम करण्यास सांगितले आहे.

आरोग्य आणि सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा व मार्गदर्शन घेतल्यानंतर फेसबुकच्या अंतर्गत समितीने हा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. आम्ही कर्मचाऱ्यांना जुलै २०२१ पर्यंत घरातून काम करण्याची परवानगी देत आहोत. यासाठी १ हजार डॉलर अतिरिक्त दिले जातील. ज्यातून घरात ऑफिस संदर्भातील कामसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करता येतील.

करोना व्हायरस लवकर जाइल असे वाटत नाही. त्यामुळे गुगलने गेल्या महिन्यात दोन लाख कर्मचाऱ्यांना पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत घरातून काम करण्याची परवानगी दिली होती. कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या एका इ-मेलमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले होते की, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यातील योजना तयार केली आहे. यानुसार वर्क फ्रॉम होमचा पर्याय ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात येत आहे. हा पर्याय अशा लोकांसाठी असेल ज्यांना त्याच्या कामासाठी ऑफिसला येण्याची गरज नाही. गुगलच्या जगभरातील २ लाख कर्मचाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टर्ससाठी वर्क फ्रॉम होम हा पर्याय देण्यात आला आहे. हा पर्याय ऐच्छिक असेल आणि तो ३० जून २०२१ पर्यंत लागू असेल.

गुगल, फेसबुकने पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत तर ट्विटरने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कायमचे घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. जर कर्मचाऱ्यांना हवे असेल तर ते कायम स्वरुपी घरातून काम करू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button