breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: शहापूरमध्ये ५ नवे कोरोनाग्रस्त; एकूण संख्या १६ वर
करोना विषाणूच्या वाढत्या संख्येमुळे शहापूर तालुक्यावरील करोनाचे संकट अधिक तीव्र होत चालले आहे. शनिवारी तब्बल पाच रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून यात एका महिलेचा समावेश आहे. यानंतर तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६ वर पोहोचली आहे. यापैकी एका रुग्णाचा आठ दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता.