breaking-newsआंतरराष्टीय

तरुणांमध्ये दीर्घकाळही राहू शकतो कोरोना

न्यूयॉर्क – तरुणांना कोरोना होत नाही आणि झाला तरीही ते या आजारातून लवकर बरे होतात असे म्हटले जाते, मात्र त्याबाबतही काही वेगळे निष्कर्ष तज्ज्ञ डॉक्टरांनी काढले आहेत. अमेरिकन डॉक्टरांनी केलेल्या एका अभ्यासात तरुणांमध्ये कोरोना हा आजार दीर्घकाळ राहू शकतो, असे आढळून आले आहे. तरुणांमध्ये कोरोनाची लक्षणे फार गंभीर नसली तरी काही लक्षणे त्यांना दीर्घकाळ राहू शकतात आणि त्याचा त्रास होऊ शकतो असे त्यांना आढळून आले. त्यामुळे काळजी घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दरम्यान, ऑक्सफोर्डशिवाय रशिया आणि चीन या देशांनी तयार केलेलं कोरोना वॅक्सीनही अंतिम टप्प्यात आलं असून त्यावर निरीक्षण सुरू आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनासाठी संपूर्णपणे वॅक्सीनवर अवलंबून राहता येणार नाही. अंतिम टप्प्यातील निरीक्षण आणि प्रत्यक्षात उपलब्ध झाल्यानंतरही सुरुवातीच्या टप्प्यात येणारी आव्हाने यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button