breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

#CoronaVirus: कृष्णकुंजभोवती कोरोनाचा विळखा, राज ठाकरेंच्या 7 कर्मचाऱ्यांना कोरोना

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आणखी एका चालकाला कोरोनाची लागण झालेली आहे. यासह राज ठाकरे यांच्या एकूण 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा विषाणूचा संसर्ग झालेला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजभोवती कोरोनाचा विळखा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाने थेट कृष्णकुंजवर धडक दिल्याने मनसैनिकही काळजीत पडल्याचं पाहायला मिळत आहे.

सर्वात आधी राज ठाकरे यांच्या घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी 3 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर त्याचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजमध्ये घरकाम करणाऱ्या सेवकालाही कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर राज ठाकरे यांच्या दोन चालकांनाही कोरोनाची लागण झाली. आता पुन्हा एकदा आणखी एका चालकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडालेली आहे. यासह राज ठाकरेंच्या आजूबाजूला कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आता 7 वर पोहचली आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 2 वाहनचालकांना याआधीच ‘कोरोना’ची लागण झाली होती. आता पुन्हा एका चालकाला संसर्ग झाल्याने एकूण 3 वाहन चालकांना कोरोना संसर्ग झाला आहे. वाहन चालकांवर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या काही शासकीय सुरक्षा रक्षकांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने त्यांनी ‘कोरोना’वर यशस्वी मातही केली आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी ‘कृष्णकुंज’च्या दारातच कोरोनाला रोखल्याचं बोललं जात होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button