breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ
संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी होणार, अनिल देशमुखांची ग्वाही
नागपूर – पूजा चव्हाण प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. त्यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हंटलंय. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांचीही चौकशी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
अनिल देशमुख यांनी तब्बल आठ दिवसानंतर पूजा चव्हाण प्रकरणावर मौन सोडलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असं देशमुख यांनी सांगितलं.