breaking-newsआंतरराष्टीय
अमेरिकन पोस्ट खात्याच्या एका चुकीमुळे 35 लाख डॉलर्सचा फटका
न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकन पोस्ट खात्यच्या एका चुकीमुळे 35 लाख डॉलर्सचा फटका बसला आहे. सन 2010 मध्ये जारी एका टपाल तिकिटावर स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याऐवजी चुकून लास व्हेगास येथील लेडी लिबर्टीचे चित्र छापले गेले होते. लेडी लिबर्टीचे चित्र टपाल तिकिटावर छापल्यामुळे कॉपीराईट कायद्याचा भंग झाला, परिणामी अमेरिकन पोस्ट खात्याला 35 लाख डॉलर्स दंड भरावा लागणार आहे. फेडरल कोर्टाने कॉपीराईट कायद्याचा उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे.
लेडी लिबर्टीची प्रतिमा रॉबर्ट डेव्हिडसन या कलाकाराने निर्माण केली असून ती न्यूयॉर्कच्या न्यूयॉर्क कॅसिनोमध्ये ठेवण्यात आलेली आहे,