breaking-newsआंतरराष्टीय

मोसूलमध्ये उध्वस्त इमारतींखाली सापडले 5,200 पेक्षा अधिक मृतदेह

मोसूल (इराक) – इराकच्या मोसूल शहरात उध्वस्त इमारतींच्या ढिगाऱ्याखाली 5 हजार 200 पेक्षा अधिक मृतदेह सापडले आहेत. गेल्या महिनाभरात सापडलेल्या 5228 मृतदेहांपैकी 2658 मृतदेह नागरिकांचे असून 2570 मृतदेह इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांचे असल्याची माहिती मोसूल नगर पालिकेच्या लाईथ जैनी यांनी दिली आहे.

गुरुवारी शवान शहरात आणखी सहा मृतदेह सापडल्याचे आणि आणखी 500 ते 700 मृतदेह ढिगाऱ्यांखाली असल्याचे जैनी यांनी बोलून दाखवले. दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ दबून राहिलेल्या या मृतदेहांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे त्यांनी सांगितले.

आयएसच्या दहशतवाद्यांच्या मृतदेहांची ओळख पटल्यानंतर ते वेगळ्या कबरस्थानत पुरले जाणार आहेत. जून 2014 मध्ये मोसूलवर आयएस दहशतवाद्यांनी कब्जा मिळवला होता. जुलै 2017 मध्ये मोसूल आयएसच्या ताब्यातून मुक्त करण्यात आल्याची घोषण इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button