breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेचे विदेश मंत्री उत्तर कोरियात

अण्विक निशस्त्रीकरणाचा आराखडा तयार करणार 
प्योंगयांग – अमेरिकेचे विदेश मंत्री माईम पोम्पेओ हे उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले असून तेथे ते उत्तर कोरियाबरोबर अण्विक निशस्त्रीकरणाच्या योजनेला अंतिम स्वरूप देणार आहेत असे सांगण्यात येते. अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये अलिकडेच सिंगापुर येथे झालेल्या महत्वाच्या बैठकीनंतर या विषयाला चालना देण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून सुरू आहे. उत्तर कोरियाला अण्वस्त्र निर्मीतीपासून पुर्णपणे रोखणे हे त्यांचे मुख्य उद्दीष्ठ असून त्याच संबंधात चर्चा करण्यासाठी पोम्पेओ हे तेथे आले आहेत.

किम जोंग आणि ट्रम्प यांच्यातील चर्चेत ठरल्यानुसार संपुर्ण कोरियन द्विपकल्प अण्वस्त्र मुक्त केला जाणार आहे. त्यासाठी उत्तर कोरियाला राजी केले जात आहे. पोम्पेओ यांचे काल उत्तर कोरियाच्या राजधानीत आगमन झाले. त्यांचा हा तेथील तिसरा दौरा आहे. कालच त्यांनी उत्तर कोरियाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते किम योंग चोल यांच्याशी चर्चा केली.

उत्तर कोरियाने आण्विक निशस्त्रीकरण केल्यानंतर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने उचलायचे मान्य केले आहे. त्या मुद्‌द्‌याच्या अनुषंगाने दोन्ही देशांमध्ये अजून काही चर्चा होणे बाकी आहे. त्यामुळे या एक दोन भेटीत हा पुर्ण अण्विक निशस्त्रीकरणाचा विषय मार्गी लागण्याची शक्‍यता नाही. अनेक अंगाने त्याचा तपशील ठरवावा लागणार असल्याचे अमेरिकेच्या सूत्रांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button