breaking-newsपुणे

विमाननगरमध्ये टेम्पोवर झाड कोसळल्याने चालक जखमी

पुणे – पुण्यातील विमाननगर भागात टेम्पोवर झाड कोसळल्याने चालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच शहराला मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे.

काल दिवसभर शहरात ७२ मी मी पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी गटारे तुंबलेली बघायला मिळाली. आज सकाळपासून पाऊस सुरु झाल्याने शालेय विद्यार्थी आणि चाकरमान्यांची गडबड झालेली बघायला मिळाली. यंदाच्या वर्षी मान्सून उशिरा आल्याने नागरिकांनी मात्र पावसाचे उत्साहाने स्वागत केले आहे. शहरातील काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

विमाननगर भागातील सावंत पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोवर झाड कोसळले. या घटनेत टेम्पो चालक बालाजी केरबा फड किरकोळ जखमी झाले आहे. या घटनेची अग्निशमन दलाने गंभीर दखल घेतली असून तात्काळ झाड बाजूला करण्याचे काम सुरु केले आहे. या घटनेत टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button