breaking-newsराष्ट्रिय

अपवाद म्हणून केरळसाठी परदेशी मदत घेतली जावी, भाजपा मंत्र्याची मागणी

केरळमध्ये आलेल्या महापूरामुळे प्रचंड नुकसान झालं असून देशभरातून आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला जात आहे. परदेशातूनही केरळसाठी आर्थिक मदत मिळत आहे, मात्र केंद्र सरकारने ती घेण्यास नकार दिला आहे. केरळ सरकार मात्र ही मदत घेण्यास तयार असून भाजपा मंत्री के जे अल्फोन्स यांनीदेखील राज्य सरकारला पाठिंबा देत सरकारकडे अपवाद म्हणून केरळसाठी परदेशी मदत स्विकारली जावी अशी विनंती केली आहे.

केरळसाठी मिळणारी परदेशी आर्थिक मदत केंद्र सरकारने घेण्यास नकार दिल्यापासूनच हा विषय चर्चेत आला आहे. अल्फोन्स यांनी एनडीए सरकारने नैसर्गिक संकटात परदेशातून आर्थिक मदत न घेण्याचा आधीच्या सरकारचा निर्णय तसाच कायम ठेवला असल्याचं सांगितलं आहे.

‘परदेशी चलनाचा विचार केल्यास केरळने गेल्या 20 वर्षात खूप मोठं योगदान दिलं आहे. गतवर्षी त्यांनी 75 हजार कोटी कमावले होते. केरळ आपल्या देशातील सर्वात मोठं पर्यटनस्थळ असून, देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचा मोठा वाटा आहे. या कारणांसाठी एक कनिष्ठ मंत्री म्हणून मी माझ्या वरिष्ठांना केरळ राज्याची विशेष दखल घेतली जावी अशी विनंती करतो. एकदा अपवाद म्हणून मदत स्विकारली जावं असं मी आवाहन करतो’, असं अल्फोन्स यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button