breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेत तीन हजार पदे रिक्त ; सरळसेवेची पदे भरण्याची मान्यता द्या

– भाजप नगरसेवक तुषार कामठेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी 

– सर्वच विभागात वाणवा ः अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्‍त ताण 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील शासन मंजूर 11 हजार 044 पदापैकी 3 हजार 093 पदे रिक्‍त आहेत. यामुळे सर्वच विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. मात्र, रिक्‍त पदामुळे सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्‍त कामाचा ताण येवू लागला आहे. याकडे महापालिका आयुक्‍तांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आकृतिबंध शासनाने त्वरीत मंजुरी देवून आस्थापनेवरील अत्यावश्यक सेवेतील आवश्यक सरळसेवेने रिक्त पदे भरण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी केली.  

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील 6 हजार 699 या छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायिक कंपन्यामुळे ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधात आलेल्या नागरिकांनी वास्तव्य केले. यामुळे शहराची लोकसंख्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यावेळी नगरपालिका असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर 1981 मधील जनगणनेनुसार आधारावर 11 ऑक्‍टोबर 1982 रोजी पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर करण्यात आले.

त्यानुसार महापालिकेत गट अ- 85, गट ब – 208, गट क – 2987 तर गट ड – 4181 अशा एकूण 7 हजार 951 एवढे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरली होती. मात्र, महापालिकेत सामाविष्ट 18 गावाचा समावेशाने महापालिकेचे क्षेत्रफळ प्रचंड वाढले. आता महापालिकेचे क्षेत्रफळ 177.3 चौरस किलो मीटर एवढे झालेले आहे. तर मिळकतींची संख्याही 4 लाख 7 हजार 910 एवढी झालेली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रफळ व कामांचा ताण अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येवू लागला आहे. तरीही महापालिकेत सरळसेवेने कर्मचारी भरती झालेली नाही.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर शासन मंजूर असलेल्या गट अ -225, गट ब – 268, गट क -5166, गट ड इतर – 5385,  ही वर्ग एक ते वर्ग चार अशा एकूण 11 हजार 044 पदे मंजूर आहेत. यामध्ये महापालिकेत कार्यरत असणाऱ्याची संख्या नगण्य आहे. यात गट अ -83, गट ब -217,  गट क -3860, आणि गट ड -3791 अशी एकूण 7,951 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. तर महापालिकेच्या सेवेत सध्यस्थितीला अ – 142, ब -51, क 1306 आणि ड – 1594 अशी 3,093 पदे रिक्त आहेत.

महापालिका आस्थापनेवरील कर्मचा-याची नियत वयोमानानूसार सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती, निधन या कारणास्तव रिक्त पदांमध्ये वाढ होत आहे. वार्षिक सरासरी प्रमाण 300 ते 325 असे आहे. परंतू, मागील तीन वर्षात विविध कारणांनी कमी झालेली अधिकारी व कर्मचारी यांची संख्यात्मक कमी झालेली आहे.

महापालिका प्रशासन विभाग हा उपलब्ध असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनच अतिरिक्‍त काम करुन घेत आहे. यामुळे अधिकारी व कर्मचारी कामाच्या त्रासाने वैतागला असून, अनेकांनी स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय अवलंबला आहे. तसेच, मार्च 2019 पर्यंत महापालिकेतील किमान 20 टक्के अधिकारी व कर्मचारी वर्ग सेवानिवृत्त होणार आहे. त्यानंतर अधिकच कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य, अग्निशामक, वैद्यकीय, आरोग्य, अशा अत्यावश्यक सेवेतील पदेही रिक्त आहेत. या पदाचा थेट महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. क्षेत्रीय कार्यालय संख्या 6 वरुन 8 झाली.त्यामुळे नागरिकांना आवश्यक सेवा पुरविण्यााठी व नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरळसेवेची अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.
—————-

आकृतीबंध “लालफितीत’ 
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे क्षेत्रफळ, लोकसंख्या व मिळकतीचा संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे क वर्गातील महानगरपालिका 1 सप्टेंबर 2014 मध्ये ब वर्गात रुपांतर झालेले आहे. महानगरपालिका आस्थापनेवरील सर्वच विभागात भविष्यात लागणारा वर्ग एक ते वर्ग चार पर्यंतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तयार करुन राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आलेला आहे. मात्र, सरकारी लालफिती कारभारामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गेल्या अडीच वर्षांपासून आकृतीबंध पडून राहिला आहे. याकडे सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष झालेले आहे. 

——————
चौकट
आस्थापनेवरील रिक्‍त असलेली पदे
गट अ – 142
गट ब – 51
गट क – 1306
गट ड सफाई व इतर – 1594
एकूण – 3093

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button