breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनाथ अर्भकांची जबाबदारी पालिकेने घ्यावी – नीता परदेशी

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरात जिवंत व मृत अर्भके सापडण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. त्या घटनांना आळा घालत संबंधित अर्भकांच्या पालकांचा शोध घेणे आवश्यक आहे. दरम्यान अशा अनाथ अर्भकांची जबाबदारी महापालिकेने घ्यावी, अशी मागणी वुमेन्स हेल्पलाईन फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी केली आहे.

वुमेन्स हेल्पलाईन फाउंडेशनच्या वतीने पालिका आयुक्त आणि वाकड पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात स्त्री जातीचे अर्भक जन्माला घालून त्याला जिवंत अथवा मृत अवस्थेत फेकून देण्याचे तसेच निर्जन स्थळी सोडून देण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा अर्भकांना त्याचे पालक मिळेपर्यंत पालिकेने सांभाळावे. त्या अर्भकांची जबाबदारी पालिकेने घ्यावी.

वाकड पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनैतिक संबंधांमधून मुले जन्माला घालणे आणि त्या अर्भकाचा परित्याग करण्याची विकृती वाढत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सर्व रुग्णालयांना निर्बंध घालणे आवश्यक आहे. वाकड परिसरात सापडलेल्या अर्भकाच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना वुमेन्स हेल्पलाईन फाउंडेशनच्या पिंपरी चिंचवड अध्यक्षा अ‍ॅड. सारिका परदेशी, तसेच अन्य सदस्या उपस्थित होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button