breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भापकरांच्या पत्राला भीक घालणार नाही, महापौरांचा संताप, आयुक्त कात्रीत

  • मारुती भापकर यांनी अक्कल पाजळू नये
  • दोषी अधिकारी, कर्मचा-यांची चौकशी होईल

पिंपरी, (महाईन्यूज) – दोषी अधिकारी, कर्मचा-यांना पालिका सेवेत सामावून घेण्यासंदर्भात चुकीच्या पध्दतीने पत्रक काढून माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी अक्कल पाजळू नये. भापकरांच्या पत्राला मी कदापी भीक घालणार नाही, अशा शब्दांत महापौर राहूल जाधव यांनी संताप व्यक्त केला.

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लाचखोर आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अधिकारी, कर्मचा-यांना निलंबित केले होते. त्यांना पुन्हा प्रशासकीय सेवेत सहभागी करून घेण्यासाठी आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी आदेश काढले आहेत. त्यामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि आयुक्त यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी प्रसिध्दीपत्रक काढून केला आहे. त्याला महापौर राहूल जाधव यांनी सणसणीत प्रतिक्रीया दिली आहे.

महापौर जाधव म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकीय सेवेतील दोषी अधिकारी, कर्मचा-यांची चौकशी होत आहे. ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कारण, अशा अधिकारी, कर्मचा-यांना पुन्हा पालिकेत सामवून घेणे म्हणजे गैरकारभाराला हातभार लावण्यासारखेच आहे. परंतु, तसे आम्ही कदापी होऊ देणार नाही. मारुती भापकर यांनी पत्रक काढण्यापूर्वी विचार करावा. अशा पध्दतीने आरोप करणे, ही भापकर यांची चुकीची पध्दत आहे. भापकरांच्या पत्रकांना मी भीक घालणार नाही, अशा शब्दांत राग व्यक्त करत महापौर जाधव यांनी पातळी सोडली.

  • दोषी अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करण्यात यावी. काहीजणांची चौकशी सुरू आहे. तर, काहीजणांवर ठपका ठेवण्यात आला असेल. न्यायालयाच्या अधीन राहून संबंधित दोषी अधिकारी किंवा कर्मचा-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना महापौर जाधव यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button