breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

रशिया- युक्रेनमधील युद्धाचा धोका टळला! रशियन सैनिकांना माघारी येण्याचे आदेश

रशिया | टीम ऑनलाइन
रशिया-युक्रेन हल्ल्याबाबत अमेरिकेसह युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा आता फेटाळला जात असून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रशियन लष्कराने युक्रेनच्या सीमेवरून आपले सैन्य मागे घेतले आहे. त्यामुळे तिसरे महायुद्ध टळले आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालेला दिसला असून, मंगळवारी मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजाराने बुधवारी पुन्हा एकदा उसळी घेतली असून, सेन्सेक्स मध्ये १७०० अंकांहून अधिक तेजी दिसून आली. सेन्सेक्सने ५८ हजारांचा टप्पा पुन्हा पार केला आहे.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला होता की, रशिया १६ फेब्रुवारीला हल्ला करू शकतो. मात्र रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची पूर्णपणे तयारी केली असताना, युद्ध मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. ज्यामध्ये युक्रेनच्या सीमेवर अनेक ठिकाणांहून सैनिक आपल्या एअरबेसवर परत जात आहेत. रशियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, युक्रेनच्या सीमेजवळील रशियन सैन्य आता माघार घेत आहे.

दरम्यान, एएफपी या वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनवरून रशिया आणि जर्मनी यांच्यातील वाढत्या वादानंतर मोठा निर्णय घेण्यात आला असून सैन्याला माघार घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत रशियाच्या या निर्णयामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पाश्चात्य देशांची एकजूट असल्याचे सांगितले जात आहे. युरोप आणि नाटो एकत्र आहेत, आमची परीक्षा घेऊ नका, असा इशारा जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी रशियाला दिला.

रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ १००,००० हून अधिक सैन्य तैनात केल्यामुळे अमेरिकेसह युरोप आणि आशियातील अनेक देशांनी निषेध केला. रशियाने हल्ला केल्यास युक्रेनचे तसेच अनेक देशांचे मोठे नुकसान होईल, असे अनेक देशांनी निवेदने जारी केले. आदल्या दिवशी शेअर बाजारातही मोठी घसरण नोंदवण्यात आली आणि आज युक्रेन सीमेवरील ताज्या परिस्थितीबाबत अमेरिकन सॅटेलाइट कंपनीकडून काही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्यांनतर जर्मनीकडून रशियाला इशारा दिल्यांनतर मात्र रशियाने आपल्या सैन्याला माघारी येण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनतर पुन्हा एकदा बजाज फायनान्स, एल अँड टी, बजाज फायनान्शियल्स सर्व्हिसेस, एशियन पेंट्स आणि कोटक महिंद्र बँक आजचे सर्वाधिक वधारणीचे शेअर्स ठरले.

बजाज फायनान्सचा मार्केट कॅपने एसडीएफसी घौडदोडीला मागे टाकले. रशिया-यूक्रेन वादाचे मोठे पडसाद भारतीय शेअर बाजारावर दिसून आले होते. गुंतवणुकदारांना कोट्यावधी रुपयांवर पाणी सोडावे लागले होते.मात्र काल पुन्हा एकदा शेअर बाजाराने उसळी घेतली असून, सेन्सेक्स मध्ये तेजी दिसून आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button