गणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

गणेशोत्सव 2023: यंदाच्या गणेशोत्सवाचे काय आहे विशेष महत्त्व

यंदाची गणेश चतुर्थी असणार दरवर्षीपेक्षा विशेष, मुहूर्त आणि पुजा विधी

पिंपरी-चिंचवड : भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तिची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. देशभरासह अन्य देशातही मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो. गणपती बाप्पाच्या आगमनाची यंदाची तारीख, महत्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त याविषयी जाणून घेऊया.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. श्रावण महिना लागल्यानंतर लहान मोठ्यांसह सगळेच बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालेले असतात. दरवर्षी गणेशोत्सव देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. याला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असेही म्हणतात. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची ख्याती संपूर्ण भारतभर पाहायला मिळते. यादरम्यान भाविक सलग 10 दिवस संपूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा करतील. यावर्षी गणेश चतुर्थीला 2 शुभ संयोग घडत आहेत. पंचांगानुसार 19 सप्टेंबर रोजी स्वाती नक्षत्र दुपारी 01.48 पर्यंत राहील. त्यानंतर विशाखा नक्षत्र रात्रीपर्यंत राहील. अशा स्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी 2 शुभ योग तयार होतील. याशिवाय या दिवशी वैधृती योगही असेल, जो अत्यंत शुभ मानला जातो. यामुळे यंदाच्या गणोशोत्सवाला विशेष महत्त्व असल्याचे मानले जात आहे.

गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात, असे म्हणतात. जिथे बाप्पाचा वास असतो तिथे प्रत्येक क्षणी सुख-समृद्धी असते. या वर्षी गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि स्थापना पद्धत जाणून घेऊया.

गणेश चतुर्थी 2023 ची अचूक तारीख
गणेशोत्सव 19 सप्टेंबरपासून सुरू होऊन 28 सप्टेंबर 2023 रोजी संपेल. 28 सप्टेंबर 2023 रोजी गणेश विसर्जन होणार आहे.

गणेश चतुर्थी 2023 चा शुभ मुहूर्त:
गणेश स्थापनेसाठी शुभ वेळ–19 सप्टेंबर–सकाळी 11:07 ते दुपारी 01:34

अशी करावी बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना…
श्रीगणेशाचे स्मरण करताना सर्वप्रथम ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करावा.
त्यानंतर चौरंगावर ठेवलेल्या गणेशमूर्तीवर पाणी शिंपडावे.
पूजेच्या साहित्यात हळद, तांदूळ, चंदन, गुलाल, शेंदूर, मौली धागा, दुर्वा, जानवे, पेढे, मोदक, फळे, हार, फुले यांचा समावेश करावा.
आता गणपतीच्या पूजेसाठी तयार केलेले सर्व साहित्य एक एक करून अर्पण करा.
यानंतर श्रीगणेशासह भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी.
त्यानंतर बाप्पाची विधीवत पूजा करा. आरतीनंतर 21 लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करा.
गणपतीच्या मूर्तीजवळ 5 लाडू ठेवा आणि बाकीचे प्रसाद म्हणून ब्राह्मण आणि आसपासच्या लोकांना वाटून घ्या.

टीपः (ही माहिती इंटरनेवर उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली असून, याच्या तथ्यांबद्दल महाईन्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button