breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

शिवपुतळय़ाचा अवमान केल्याप्रकरणी कमलनाथ यांनी माफी मागावी – उदयनराजे

मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे ‘जेसीबी’च्या सहाय्याने शिवरायांचा पुतळा तोडण्याचा प्रकार हा अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह असून याबद्दल मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेस पक्षाने जाहीर माफी मागावी, अन्यथा शिवप्रेमींना त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यावे लागेल, असा इशारा शिवरायांचे तेरावे वंशज व माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेला आहे.

मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा शहरात असलेला शिवरायांचा पुतळा स्थानिक प्रशासनाने रातोरात ‘जेसीबी’ आणि बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केला आहे. या घटनेचे चित्रीकरण ‘समाज माध्यमां’वर सर्वत्र फिरू लागल्यावर मध्यप्रदेश सरकार आणि काँग्रेस पक्षाविरुद्ध सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचाही निषेध होत आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी या संतापजनक प्रकाराबद्दल चीड व्यक्त करत कमलनाथ आणि काँग्रेस पक्षाने जाहीर माफीची मागणी केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button