breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

अंडर १९ वर्ल्ड कप : ICC कडून बांग्लादेशी आणि भारतीय खेळाडूंवर कारवाई

दुबई | अंडर १९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांग्लादेशने भारतावर मात करत पहिल्यांदा विजेतेपद पटकावले. पण विजयानंतर जल्लोष करताना बांग्लादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये हामरीतुमरी झाली होती. त्यावेळी बांग्लादेशी खेळाडू भारतीय खेळाडूंवर बॅट आणि स्टंप घेऊन धावले होते. अंपायर्सने मधस्थी करत मोठा अनर्थ टाळला.

पण या राड्यामुळे बांग्लादेशच्या विजयाला गालबोट लागले. या प्रकरणी आयसीसीने व्हिडिओ फुटेज तपासून वाद घालणाऱ्या ५ खेळाडूंवर कारवाई केली आहे. यात तीन बांग्लादेशी तर दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई केली आहे. बांग्लादेशकडून तौहीद हृदॉय, शमीम हुसैन आणि रकीब उल हसन तर भारताकडून आकाश सिंह आणि रवी बिश्नोई यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या पाच खेळाडूंवर आयसीसीचा नियमांचा भंग केल्यामुळे ४ ते १० सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. सामना अतिशय रंगतदार झाला.

पण बांग्लादेशच्या विजयानंतर जो प्रकार घडला त्याकडे आयसीसी दुर्लघ करू शकत नाही, असे ICC च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. क्रिकेटमध्ये दुसऱ्याप्रती आदर दाखवणे खूप महत्त्वाचे आहे. खेळाडूंनी मैदानात असताना शिस्तीने वागणे, सामना जिंकल्यानंतर किंवा पराभव झाल्यावर प्रतिस्पर्ध्यांचे अभिनंदन किंवा त्यांच्या खेळाचे कौतुक करणे खूप महत्त्वाचे असते. पण अंडर १९ च्या फायनलनंतर अंतीम सामन्यानंतर जे काही घडले. त्यात सर्व नियमांचा भंग झाला.

या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईलाही आयसीसीने २ डिमेरीट पॉइंन्ट दिलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button