breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

धक्कादायक! सात वर्षाच्या मुलाला बलात्कारा प्रकरणी अटक; कौटुंबिक न्यायालयात चालणार खटला

नवी दिल्ली |

न्यूयॉर्कमध्ये एका सात वर्षाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. थँक्सगिव्हिंगच्या वेळी झालेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली होती. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, २३ मार्चला मुलावर थर्ड डिग्री बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुलाची सुटका करण्यात आलेली असून त्याच्यावर कौटुंबिक न्यायालयात खटला चालणार आहे. दरम्यान न्यूयॉर्क शहराचे अॅटर्नी अँथनी मार्टोन यांनी हे प्रकरण हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.

“वयाच्या सातव्या वर्षी आपण काय करतो याची आपल्याला कल्पनाही असते असं मला वाटत नाही,” असं ते म्हणाले आहेत. “मुलाने शारिरीकरित्या सहभागी होत हा गुन्हा केला हे सिद्ध करावं लागणार आहे जे माझ्या मते पूर्णपणे अशक्य आहे,” असं मत अँथनी यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेतील कायद्यानुसार सहा वर्षांच्या वरील मुलावर अल्बानी कयद्यांअंतर्गत खटला दाखल केला जातो. या कायद्याअंतर्गत येणारी किमान वयोमर्यादा वाढवण्यासाठी सामाजिक संघटना लढा देत आहेत.

वाचा- PPF वरील व्याजदर जैसे थे: तो आदेश चुकून निघाला- अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button