breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अंंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी घडामोड, मुंबईत NCBचे अटकसत्र सुरू

मुंबई: अभिनेत्री सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणीअंमली पदार्थ तस्करीचा अँगल समोर आल्याने हे प्रकरण एका धक्कादायक वळणावर गेलेले आहे. दरम्यान अंंमली पदार्थ तस्करी प्रकरणी NCB चे मुंबईमध्ये अटकसत्र सुरू झालेले आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण या अटक झालेल्या दोघांशीही तर शौविकचे आणखी कनेक्शन उघडकीस आलेले आहे. जैद आणि बशीद अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत. NCB कडून आतापर्यंत फक्त चौकशी सुरू होती मात्र आता याप्रकरणात जैद या ड्रग डीलरची पहिली अटक करण्यात आलेली आहे.

मंगळवारी एनसीबीकडून जैद नावाच्या ड्रग डीलरला अटक करण्यात आलेली आहे. जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर असून हा थेट शौविकच्या संपर्कात होता. तो वांद्रे याठिकाणचा होता. जैदने अनेकदा शौविकला अंमली पदार्थांची डिलीव्हरी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे NCB ला शंका आहे की रिया देखील शौविककडून अंमली पदार्थ घेत असावी. या घटनांनंतर रियाच्या आधी शौविक चक्रवर्तीला NCB लवकरच ताब्यात घेणार आहे अस बोलले जात आहे. जैदकडून 17 मार्च 2020 या दिवशी शौविकने अंमली पदार्थ घेतलेले होते, असे समोर आलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button