breaking-newsमुंबई

ठाणे महापालिकेने शहरातील मॉल्स आजपासून खुले करण्याची दिली परवानगी

ठाणे – ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहरातील मॉल्स आजपासून खुले करण्याची परवानगी दिली आहे. राज्य सरकारने 1 ऑगस्टपूर्वीच ठाण्यातील मॉल्स, मार्केट व कॉम्प्लेक्स उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी मॉल्स, मार्केट आणि कॉम्प्लेस उघडण्यास नकार दिला होता. मात्र आता एका महिन्यानंतर आजपासून महापालिकेने मॉल्स उघडण्यास परवानगी दिली आहे.

यापूर्वी 15 ऑगस्टपासून महापालिकेने दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. एक दिवस आलटून-पालटून एकेका रस्त्यावरील समोरासमोरील दुकाने उघडण्याची परवानगी महापालिकेने दिली होती. मात्र मॉल्स, मार्केट, कॉम्प्लेक्स, जिम, स्विमिंग पूल यांना बंदी घातली होती. आज ठाण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील कोरम मॉल, व्हिवियाना मॉल, सिटी मॉल, हाय स्ट्रीट मॉल, अनंत मॉल, वंडर मॉल असे सर्वच मॉल्स खुले होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button