breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्येही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने राहणार बंद

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचे सुधारित आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि.६) दिले आहेत.

या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते संध्याकाळी सहा यावेळेत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करणेत येत आहे. वैद्यकीय व इतर जीवनावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली असुन त्यांचे वाहतुकीला निबंध असणार नाहीत. आठवड्यातील सर्व दिवशी सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने, क्रिडांगणे बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा आणि मॉल्स दिवसभर बंद राहतील. तसेच अत्यावश्यक दुकानाचे परिसरात ग्राहकांमधील सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील. जीवनावश्यक वस्तू दुकानांचे मालक आणि सर्व दुकानांवर काम करणाऱ्या व्यक्तींनी लवकरात लवकर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

सार्वजनिक वाहतूक कार्यान्वित राहणार असली तरी रिक्षामध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीत चालक व वाहनाच्या ५०% क्षमेते एवढे प्रवासी तर बसमध्ये आरटीओने मान्य केलेली आसन क्षमतेनुसार परवानगी असेल. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या सर्व व्यक्तींनी योग्य प्रकारे मास्क परीधान करणे आवश्यक राहील, योग्य प्रकारे मास्क परीधान न केल्यास रक्कम रुपये पाचशे रुपये दंड आकारुन वसुल केला जाईल.

काय आहेत नवीन नियम?

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे.

सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते सकाळी 7 या कालावधीत तसेच शुक्रवार सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे.

अत्यावश्यक सेवांमध्ये रूग्णालयं, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसीज व फार्मासिटीकल कंपनी, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी, मिठाई व खाद्यपदार्थांची दुकाने

सार्वजनिक वाहतूक – सार्वजनिक बस, टॅक्सी, रिक्षा, रेल्वे, पूर्व पावसाळी नियोजित कामे, स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, कृषी संबंधित सेवा, ई- कॉमर्स, मान्यताप्राप्त मीडिया, आपत्ती

व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे घोषित केलेल्या अत्यावश्यक सेवा यांचा समावेश असणार आहे.

हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट बंद असणार आहेत. पार्सल सेवा व घरपोच सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू राहणार आहे.

याशिवाय सर्व धार्मिकस्थळ बंद राहणार आहेत.

सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

तसेच, शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत या कालावधीत संपूर्णत: बंद राहणार आहे.

रिक्षामधून प्रवास करताना वाहन चालक आणि दोन व्यक्तींना परवानगी तर कॅबसाठी 50% आसन क्षमता.

नागरिकांनी वावरताना समाजिक अंतर व स्वच्छता बाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने, मार्केट व मॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) संपूर्णत: बंद राहणार आहेत.

पाचपेक्षा जास्त रुग्ण सापडलेल्या सोसायटीला ‘मायक्रो कंटेनमेंट झोन’ जाहीर करून तिथे बाहेरील व्यक्तीला प्रवेश बंद

नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button