breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भाऊ-आप्पांचा ‘मिले सुर मेरा तुम्हारा’

  • चिंचवड सर्वाधिक मताधिक्य देणार – लक्ष्मण जगताप
  • राजकीय दृष्टीकोनातून केलेले आरोप मागे घेतोय – श्रीरंग बारणे

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेना-भाजप महायुतीचाच विजय व्हावा, याकरिता खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दुंभगलेली मतभेद कायमस्वरुपी मिटवून आप्पा-भाऊ यांच्यात मनोमिलन झाले आहे. दोघांनीही यापुढे हाडवैर विसरुन एकमेकांची गळाभेट घेत पेढ्या भरविला. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आप्पा-भाऊंचा ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ असे म्हणत मावळ लोकसभेवर विजयाचा पताका फडकाविण्यास निश्चिय केला आहे.

पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेस खासदार अमर साबळे, आमदार गाैतम चाबुकस्वार, शिवसेना संघटक गोविंद घोळवे, अमर मुलचंदानी, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, उमा खापरे, गजानन चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, आमदार लक्ष्मण जगताप आणि माझ्यात मतभेद मिटावेत, याकरिता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या दोघांशी चर्चा केलेली आहे. यापुर्वी खासदार संजय राऊत, निलम गो-हे यांनीही प्रयत्न केला. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गिरीश बापट यांनी काल (रविवारी) रात्री आमच्यातील मतभेद दूर करुन समेट घडविला. दोघांमधील सगळे गैरसमज वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेवून दूर केले आहेत.

यापुढे देशहिताच्या दृष्टीने हेवेदावे विसरुन काम करणार आहे. मागील काळात राजकीय हेतूने केलेले सगळे आरोप सगळे मागे घेत आहे. ते आरोप केवळ राजकीय दृष्टीने केलेले होते. त्यात कोणताही वैयक्तीक स्वार्थ नव्हता. असे बारणे यांनी सांगितले.

तर आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, आम्ही सर्वांनी आत्मपरीक्षण केले. स्वताःच्या चुका शोधून, एकमेकांचे गैरसमजामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्याला तिलांजली दिली.  शहरात विकास कामामुळे मतभेद होते, वैयक्तीक कोणताही मनभेद नव्हते. लोकसभा निवडणूकीत चिंचवड मतदार संघात चांगले मताधिक्य देवून मनापासून काम करणार आहे. तसेच खासदार बारणे हे किमान दोन लाख मतांनी विजयी होतील, असेही जगताप यांनी सांगितले.

खासदार अमर साबळे म्हणाले की, स्वताःपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा आहे. त्यामुळे महायुतीचे देशात सत्ता येण्यासाठी भाजप-शिवसेना युतीतील मतभेद दूर होणे काळाची गरज होती. त्यामुळे दोघांच्या मनोमिलनाने आम्ही त्याच्या निर्णयाचे स्वागत करु असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button