breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये पार्थ अजित पवार यांचा उद्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पदयात्रा

– काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकापसह मित्र पक्षांतील कार्यकर्त्यांची जोरदार तयारी
पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (कवाडे गट) यांच्यासह मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पदयात्रा काढण्यात येणार आहे.
वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील आहेर गार्डन ते निगडी प्राधिकरण तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. मंगळवारी, दि. ९ एप्रिल २०१९ रोजी, सकाळी ९ वाजता आहेर गार्डन येथून पदयात्रेची सुरूवात होईल. या पदयात्रेसाठी महाआघाडीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button