breaking-newsताज्या घडामोडी

राज ठाकरेंच्या राज्यातील सभा असतील ‘रिमाइंडर’

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजापाध्यक्ष अमित शहांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. त्यानुसार, भाजपाचा कडाडून विरोध करण्यासाठी येत्या दिवसात राज यांच्या महाराष्ट्रातील विविध भागात सभा होणार आहेत. विशेष म्हणजे ‘या सभा रिमाइंडर’ असल्याचे राज यांनी गुढीपाडवा मेळाव्यात स्पष्ट केले होते.

‘भाजपाने गेल्या पाच वर्षात अनेक घोषणा केल्या. मात्र त्याची पूर्तता केली नाही. या कोणत्या घोषणा होत्या, भाजपने लोकांची कशी फसवणूक केली याचा रिमाइंडर देणाऱ्या माझ्या आगामी सभा असतील’ असे म्हणत राज यांनी त्यांच्या आगामी सभा या मोदींवर तोफ डागणारया असतील याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील विविध भागात राज यांच्या सभा होणार असून ११ एप्रिलपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी या सभा घेतल्या जाणार आहेत. नुकत्याच गुढीपाडवा निमित्त शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या राज यांच्या मेळाव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे. सभेला झालेली गर्दी तसेच राज यांचे फोटो, व्हिडिओ, पुराव्याच्या माध्यमातून मोदी आणि अमित शहा यांच्यावर पुराव्यासकट केलेल्या टीकेची जोरदार चर्चा रंगली आहे. सोलापूर, इचलकरंजी (कोल्हापूर), कराड (सातारा), खडकवासला (पुणे), पेण किंवा अलिबाग (रायगड) या भागात राज यांची सभांची तोफ धडाडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button