breaking-newsTOP Newsराष्ट्रिय

देशात गेल्या २४ तासांत सापडले ५७ हजारांहून अधिक रुग्ण

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये रोज सर्वाधिक वाढ होत असून गेल्या २४ तासांत चक्क ५७ हजार ११७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ७६४ रुग्णांच्या मृतांचनी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १७ लाखांच्या जवळ पोहोचला आहे.

देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ९५ हजार ९८८ इतकी झाली आहे. ५० हजारांनी वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६० हजारांच्या जवळ गेली आहे. भारतात सध्या पाच लाख ६५ हजार १०३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे १० लाख ९४ हजार ३७४ जणांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ३६ हजार ५११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात करोनामुळे मरण पावणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी ४९ टक्के मृत्यू २० शहरांमध्ये झाले आहेत. या शहरात करोना संक्रमणाच्या सरासरीतही वाढ झालेली आहे. दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ३० जूनपर्यंत देशात ५ लाख ६६ हजार ८४० इतकी करोना रुग्णांची संख्या होती. जुलै महिन्यात यात सर्वाधिक भर पडली आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येत २.८ टक्क्यांनी वाढ झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button