breaking-newsताज्या घडामोडीपुणे
उरण तालुक्यात महायुतीचा प्रचारदौरा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

उरण: बारणे यांनी शनिवारी (दि. 20) उरण तालुक्यात प्रचारदौरा केला. उरण तालुक्यातून महायुतीला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येत आहे. मावळ लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून प्रचार शिगेला पोहोचला आहे.
प्रचार दौऱ्यात उरणचे आमदार मनोहर भोईर, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, भाजपचे तालुका संघटक दशरथ म्हात्रे, युवसेनेचे अवचित राऊत, भूषण ठाकूर, प्रणिता भोईर, विद्यार्थी सेनेचे रोहिदास पाटील, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शौर्याचे प्रतीक असलेल्या चिरनेर येथील स्तंभास शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी अभिवादन केले. जासई गावात दिवंगत कामगार नेते आणि माजी खासदार दि बा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच जासई येथील हुतात्मा स्मरकास अभिवादन केले. जसखार येथील रत्नेश्वरी मंदिर, डोंगरी येथील अंबादेवी मंदिर, चिरनेर येथील महागणपती मंदिरात बारणे यांनी आशीर्वाद घेतले.
बारणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारणे यांनी उरण भागात प्रचार दौरा केला. जासई, रांजणपाडा, धुतूम, चिरले, दिघोडे, विंधण, नवापाडा, टाकीगाव, भोम, कळंबुसरे, मोठीजुई, कोप्रोली नाका, पाणदिवे, पिरकोन, गोवटने, आवरे, नवघर, कुंडेगाव, भेंडखळ, गोवठणे, पाले, पुनाडे, वशेणी, पागोटे, सारंडे, पिरकोन, सोनारी, करळ, सावरखार, जसखार, पाणजे, डोंगरी, फुंडे, बोकडविरा, नवीन शेवा, करंजा, मुळेखंड, डाउरनगर, नागाव, म्हातवली, केगाव, बोरी, भवरा, बेलदारवाडा, मोरया, उरण बाजारपेट आदी गावांमध्ये भेटी दिल्या. बँड बाजाच्या गजरात, आगरी परंपरेने ठिकठिकाणी स्वागत केले.
निवडणुकीचे वारे मावळ लोकसभा मतदारसंघात जोरात वाहत आहे. कोपरा सभा, बैठका, चर्चा आणि भेटीगाठींचा जोर वाढला आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी गावभेटीचा दौरा जोरात सुरू केला आहे. गावोगावी जाऊन नागरिकांना भेटत असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नागरिकांमधून महायुतीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. याचा फायदा महायुतीला होणार आहे. बारणे यांना विविध स्तरातील नागरिक जिंकण्याचा विश्वास दाखवत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांना देखील प्रचारासाठी बळ मिळत आहे.