breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणेकरांकडून नियम पायदळी! खडकवासला धरण परिसरात पर्यटनासाठी नागरिकांची तूफान गर्दी

पुणे: खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. साधारण 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे खडकवासला धरण क्षेत्राला पर्यटन स्थळांचे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करत खडकवासला धरण परिसरात उत्साही नागरिकांनी गर्दी केली होती. रविवारी वीक एन्डची संधी साधत धरण परिसरात गर्दी वाढली होती. पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. लहान मुलं आबालवृद्ध, तरुण-तरुणी आणि कुटुंबीयांसह नागरीक पाणी पाहण्यासाठी येत आहेत.

धरणाचं निसर्गरम्य वातावरण, नयनरम्य दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी या नागरिकांनी खडकवासला धरण परिसरात गर्दी केली होती. या पर्यटकांसाठी मक्याच्या कणसांचे स्टॉलसुद्धा लागलेले होते. पर्यटकांमुळे एनडीएकडून खडकवासला दिशेनं जाणाऱ्या पुलावर वाहतूक कोंडी झालेली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खडकवासला धरण क्षेत्रात नागरिकांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, या आदेशानंतरही उत्साही नागरिकांमुळे गर्दी होत आहे. उत्साही नागरिक पुलावरच वाकडी तिकडी वाहने लावत असल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. हौशी, उत्साही पर्यटकांना आवरण्यासाठी पोलीसही गस्त घालत आहे. मात्र आता उत्साही पर्यटकांना आवरताना पोलिसांना नाकीनऊ येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button